Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 3
Slide 3
Slide 3
Slide 3
Slide 3


PHOTOGRAPHY IS A FORM OF TIME TRAVELमंडळाचा इतिहास

प्रिय भक्तजन, सप्रेम नमस्कार,

तो काळ होता १९४४ चा, स्वातंत्र्यपूर्वीचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एकात्मतेच्या उद्देशाने सुरु केलेल्या गणेशोत्सवाला एका सणाचे स्वरूप येऊ लागले होते. वातावरण अत्यंत भारावलेले असायचे. तेच वातावरण पुढे ठेवण्याच्या प्रमुख उद्देशाने मंडळाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आणि पहिल्याच वेळी म्हणजे १९४४ ला पुठ्याची देवी चाळ क्र. १९ मध्ये बसवून नवरात्रौत्सवाची सुरुवात केली. १९४५ ला मात्र चाळ क्र. १ व १९ च्या भव्य पटांगणात आता आहे त्याच जागेवर मुर्ती बनवून नवरात्र साजरा केला. त्यावेळी उद्योगपती बाळशेठ रायकर यांनी मोलाचे सहकार्य केले होते..

१९४६ पासुन मात्र ही भवानी माता जागृत असल्याचे उदाहरण समोर आले. पेशाने मुर्तीकार असलेले सावर्डेकर नावाचे एक गृहस्थ परळच्या के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या स्वप्नात भवानी माता आली आणि तिने त्यांना दृष्टांत दिला की, मला नायगांवात कायम स्वरूपी बसायचे आहे. आजारपणातून बरे झाल्यानंतर सावर्डेकर थेट नायगांवमध्ये आले. त्यांनी ही हकीकत कार्यकर्त्यांना सांगितली. काहींना खरे वाटले नाही. पण एकूणच सगळी माहिती काढल्यानंतर सावर्डेकर खरे बोलत असल्याचे जाणवले. कार्यकर्त्यांनी चंदनाची मुर्ती बनविण्याचे ठरविले. त्यासाठी सातशे रुपये खर्च आला. त्याकाळात सातशे रूपयेदेखील मोठी रक्कम होती. सगळ्यांनी एक - एक, दोन - दोन रुपये जमा करून ती रक्कम मुर्तीकार सावर्डेकर यांना दिली. त्यांनीही चंदनाच्या एकाच खोडातून भवानीमातेची मुर्ती घडवली. ती मुर्ती नावरात्रौत्सावानंतर एका खोलीत स्वतंत्र ठेवली जाऊ लागली. तिची वर्षभर पूजा-अर्चा सुरु झाली. तेव्हापासून एक जागृत देवस्थान म्हणून भाविक या मातेकडे पाहतात. तसेच त्याची प्रचीती सन १९८४ ला आली.

ती घटना आठवली की, आजही अंगावर शहारे येतात. केवळ आई भवानीमातेच्या कृपेनेच 'ते' अरिष्ट टळले. नवरात्रौत्सवातील तो नवमीचा दिवस होता. सकाळी दरवर्षीप्रमाणे होम हवन होऊन भक्त मातेचे दर्शन घेत होते. दिवसभर हा कार्यक्रम सुरु होता. संध्याकाळी अचानक मंडपाला आगीने आपल्या कह्यात घेतले. एकाच हाहाकार उडाला. कुणालाच काही सुचत नव्हते. मनात एकच विचार की, भवानी मातेच्या मुर्तीला काही होता कामा नये. कार्यकर्त्यांनी स्वतःचा मागचा पुढचा विचार न करता आगीत उडी घेऊन मुर्ती सुखरूप बाहेर काढली. आली.

Read More
background

छायाचित्र संग्रह इतर छायाचित्रे

www.chandanachidevi.com

Moutain Dew
gem of the sea
Star Rain
Bruno Mars
Green Moutain
Oversea
Historical Ocean

उत्सव २०१८